होराफळी येथे ७६ जणांना दिली गेली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST2021-06-10T04:21:16+5:302021-06-10T04:21:16+5:30
उद्घाटन होराफळी गावाचे सरपंच सुरता वळवी यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र वळवी, पोलीस पाटील दारासिंग वळवी, ...

होराफळी येथे ७६ जणांना दिली गेली लस
उद्घाटन होराफळी गावाचे सरपंच सुरता वळवी यांनी केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी रवींद्र वळवी, पोलीस पाटील दारासिंग वळवी, डॉ.कोठारी, वैद्यकीय अधिकारी परेश सोनार, राजेंद्र वाघेला, नरेंद्र सोनवणे, नथ्थू बागुल, सरदार तडवी, किरण वसावे, पंकज माळी, प्रदीप नाईक, जेहऱ्या गावित, जितेंद्र पवार, आरोग्यसेविका मनीषा पाटील, कविता पवार, रेखा वळवी, वर्षा गार्दी, जानकी तडवी, के.के. पाटील, विजयसिंग वसावे, संजय शेवाळे, छगन पाडवी, खडकापाणी माक्ता वळवी, रायसिंग वळवी, कोचऱ्या वळवी, छत्रसिंग वळवी, मालसिंग वळवी, विजयसिंग वसावे, ग्रामपंचायत कर्मचारी शिरीष वसावे, लालसिंग वसावे, रायसिंग वळवी आदी उपस्थित होते. होराफळी या परिसरामध्ये कोरोनाबाबत अनेक गैरसमज असल्याने, ग्रामपंचायतीने सोंगाड्या पार्टीच्या माध्यमातून जनजागृती केल्यामुळे ७६ लोकांनी लसीकरण करून घेतले. होराफळी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून याबाबत ग्रामस्थांना सूचना केल्या जात आहेत.