लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी - तरुणाईचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST2021-05-09T04:31:21+5:302021-05-09T04:31:21+5:30

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले, कुठलाही त्रास झाला नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, लसीकरणाची ...

Vaccination registration process should be facilitated - opinion of the youth | लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी - तरुणाईचे मत

लसीकरणाची नोंदणी प्रक्रिया सुलभ करावी - तरुणाईचे मत

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतले, कुठलाही त्रास झाला नाही. प्रत्येकाने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. दरम्यान, लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करताना दिवस व वेळ मिळविण्यासाठी दोन ते तीन दिवसांची वाट पहावी लागतेय. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया सुलभ व्हावी, अशा प्रतिक्रिया नंदुरबारातील युवकांनी दिल्या.

कुठलाही त्रास झाला नाही

आपण दोन दिवसांपूर्वी लस घेतली. हात दुखण्याव्यतिरिक्त कुठलाही त्रास झाला नाही. लस सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येकाने ती घेतली पाहिजेच. आपल्या घरातील सर्वांनी लस घेतली आहे.

-दीक्षा बेडसे, नंदुरबार.

१८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार असल्याच्या घोषणेपासून आपल्याला त्याची उत्सुकता होती. अखेर तो दिवस आला. परंतु लसीकरणासाठी नोंदणी करताना अडचणी आल्या. शहाद्यात एकच केंद्र असल्यामुळे तीन दिवसानंतर तारख व वेळ मिळाली.

- लोकेश बोरसे, शहादा.

आई-वडिलांचे लसीकरण आधीच झाले होते. दोघांना काही त्रास झाला नाही. त्यामुळे आपणदेखील हिमतीने लस घेतली. थोडा हात दुखण्याचा त्रास झाला. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन याबाबत विविध मते आहेत. परंतु सरकारी केंद्रावर मिळालेली कोविशिल्ड लस घेतली. मानसिक समाधान आणि सुरक्षितता वाटते.

- महेश पाटील, शहादा

लसीकरणाची नोंदणी तर होते, परंतु वेळेचा स्लॅाट मिळत नसल्याने अडचण येते. चार दिवसांपासून स्लॅाट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होतो. अखेर एकदाचा मिळाला. यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. तरुणाईचा यामुळे मोठा हिरमोड होत आहे.

- प्रसाद चौधरी, नंदुरबार.

Web Title: Vaccination registration process should be facilitated - opinion of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.