संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:30+5:302021-05-26T04:31:30+5:30
कोरोना महामारीने संपूर्ण जग संकटाच्या विळख्यात असून, लसीकरणाशिवाय पर्याय नाही. या अनुषंगाने सचिन भोई यांच्या संकल्पनेतून व तळोदा भोई ...

संत भीमाभोई यांच्या जयंतीनिमित्त लसीकरण
कोरोना महामारीने संपूर्ण जग संकटाच्या विळख्यात असून, लसीकरणाशिवाय पर्याय नाही. या अनुषंगाने सचिन भोई यांच्या संकल्पनेतून व तळोदा भोई समाज नवयुवक मंडळ यांच्यामार्फत लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रोत्साहन म्हणून नेमसुशील विद्यामंदिरातील शिक्षक व युवा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत भोई यांच्याकडून प्रत्येकी गहू व तांदूळ वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ५० व्यक्तींचे लसीकरण झाले. जिल्हा परिषद तंत्रस्नेही शिक्षक योगेश सोनवणे, परिचारिका इरला गवळी, प्रीती सहानी, निशा पावरा, विशाल चौधरी, तालुकाध्यक्ष धनालाल भोई, संतोष वानखेडे, शिवदास साठे, प्रकाश वानखेडे, जगदीश वानखेडे, चंद्रकांत साठे, गणेश शिवदे, जालंधर शिवदे, प्रमोद मोरे, धनराज सोनवणे, गिरीश वानखेडे, मयूर वानखेडे, निखिल साठे, भोई समाज पंच महिला अध्यक्षा बेबीबाई सोनवणे, संगीता रामोळे, उषाबाई तावडे, विद्याबाई वानखेडे, राणूबाई शिवदे, सविताबाई ढोले व समाज बांधव उपस्थित होते.