सारंगखेडा येथे लसीकरणाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST2021-06-27T04:20:32+5:302021-06-27T04:20:32+5:30
यावेळी उपसरपंच अनिता भिल वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, अशोक कुवर, ...

सारंगखेडा येथे लसीकरणाचा शुभारंभ
यावेळी उपसरपंच अनिता भिल वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष मोरे, अशोक कुवर, मनोज भिल, धनराज चव्हाण, न्हानभो भिल, दीपिका ठाकरे, सोनाली मोरे, रेखा ठाकरे आदींनी स्वतः लसीकरण करून घेतले. सरपंच रावल म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये लसीचा तुटवडा आहे. लोक लसीकरणासाठी प्रतीक्षा करीत असताना आपल्या जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून वेळोवेळी लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र लसीकरणासाठी अद्यापही गैरसमज आहे. कोरोनापासून लांब राहण्यासाठी लसीकरण करुन घेणे गरजेचे असल्याने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले. यावेळी सारंगखेडा, पुसनद, बामखेडा त.सा., शेल्टी ही गावे मिळून २१० लोकांनी लसीकरण करून घेतले. यासाठी सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कांतीलाल पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, आरोग्य सहायक रवींद्र महिरे, आरोग्य सेविका दीपाली गिरासे, रूपाली सानप, मनीषा रामोळे, आरोग्य सेवक योगेश ठाकूर, भारती तायडे, भूपेंद्र भावसार, लड्डू रावल आदींनी परिश्रम घेतले.