चार खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांमध्ये लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:36 IST2021-03-01T04:36:04+5:302021-03-01T04:36:04+5:30
नंदुरबार : शासकीय कर्मचारींमधील फ्रंट वर्करसह आता सामान्य नागरिकांना देखील १ मार्चपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी खासगी ...

चार खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयांमध्ये लस
नंदुरबार : शासकीय कर्मचारींमधील फ्रंट वर्करसह आता सामान्य नागरिकांना देखील १ मार्चपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यासाठी खासगी दवाखान्यांना मान्यता देण्यात आली आहे. नंदुरबारात तीन तर शहादा येथील एक अशा चार दवाखान्यांमध्ये लसीकरण केले जाणार आहे. सुरुवातीला केवळ ६० वर्षावरील व ४५ वर्षावरील गंभीर आजारी असलेल्यांचा समावेश त्यात केला जात आहे.
सामान्य नागरिकांना लस कधी मिळणार याबाबत उत्सुकता होती. ती आता संपली आहे. १ मार्चपासून खासगी दवाखान्यांमध्ये सामान्य नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यासाठी मात्र अडीचशे रुपये मोजावे लागणार आहेत. जिल्ह्यात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद, महसूल व पोलीस दलातील कर्मचारी त्यात सहभागी करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना लस दिली जात आहे. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून शाळा सुरू होऊनही माध्यमिक शिक्षकांचा त्यात समावेश करण्यात आलेला नाही किंवा त्यांचा विचारही करण्यात आलेला नाही.
सामान्यांमध्ये उत्सुकता
जिल्ह्यातील चार खासगी दवाखान्यांना कोरोना लसीकरण करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. नंदुरबार शहरातील चार तर शहादा येथील एका दवाखान्याचा समावेश आहे. खासगी दवाखान्यांमध्ये लसीकरणाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावरून जिल्ह्यात आणखी खासगी दवाखान्यांमध्ये केंद्र वाढविण्याचा विचार केला जाणार आहे. याशिवाय दहा केंद्र शासकीय सुरू आहेत.
ज्येष्ठ नागरिक लसीकरण करून घेता किंवा कसे याकडेही लक्ष लागून आहे. लसीकरणामुळे आतापर्यंत कुणालाही त्रास झालेला नाही. त्यामुळे निसंकोचपणे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे याआधीच करण्यात आले आहे. त्यानुसार जनजागृतीही करण्यात येत आहे.
खासगी लसीकरण केंद्र
n मेडिकेअर सर्जिकल ॲण्ड डेण्टल क्लिनिक, नंदुरबार.
n पटेल सर्जिकल ॲण्ड ॲण्डोस्कोपी सेंटर, नंदुरबार.
n जय श्री दत्त ॲक्सिडेन्ट हॅास्पिटल, नंदुरबार.
n सुश्रूत नर्सिंग होम, खेतियारोड, नंदुरबार.
सरकारी लसीकरण केंद्र...
n जिल्हा रुग्णालय
n नवापूर उपजिल्हा रुग्णालय
n म्हसावद ग्रामीण रुग्णालय
n अक्कलकुवा ग्रामिण रुग्णालय
n तळोदा उपजिल्हा रुग्णालय
n शहादा ग्रामीण रुग्णालय
n धडगाव ग्रामीण रुग्णालय
n जेपीएन हॅास्पीटल, नंदुरबार.
नोंदणी करण्यासाठी...
सरकारी व खासगी लसीकरण केंद्रात नोंदणीसाठी ६० वर्षावरील व्यक्तींना आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आवश्यक आहे. त्यांची नोंदणी केल्यानंतर त्यांना संबंधित तारखेला बोलविले जाईल. तर ४५ वर्षावरील परंतु गंभीर आजार असलेल्यांना आधारकार्डसह कुठला आजार आहे त्याची माहिती आणि संबंधित दवाखान्याची फाईल किंवा कागदपत्र सोबत नेणे आवश्यक आहे.