लहान शहादे परिसरात लसीकरण मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:18 IST2020-01-20T15:18:13+5:302020-01-20T15:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादा : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, धामडोद येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद ...

लहान शहादे परिसरात लसीकरण मोहिम
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान शहादा : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, कोळदे, धामडोद येथे पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या योगिनी अमोल भारती, पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई केशव पाटील यांच्या हस्ते बालकास डोस पाजून करण्यात आला.
प्रारंभी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीच्या उपसभापतींचा ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी आश्वासनांची पूर्तता करण्यास सांगितले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य करम रमण भिल, लहान शहाद्याच्या सरपंच सुपीबाई पाडवी, अमोल भारती, प्रभाकर पाटील, लहान शहादा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जयेश सूर्यवंशी, जिल्हा परिषद आरोग्य विस्तार अधिकारी जे.एस. पवार, डॉ.राकेश पाटील, एन.बी. बोरदे, एस.ए. कोकणी, आर.एस. मराठे, पी.जी. ब्राह्मणे, के.के. गावीत, ए.एस. ठाकरे, एन.एच. शिरसाठ, राकेश ठाकूर, एस.एम. ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य आत्माराम भिल, छोटू भिल, कोळदा येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितचीे अध्यक्ष नथ्थू वळवी, शिंद्याचे सरपंच मंगलाबाई भिल, धामडोदचे सरपंच शोभाबाई भिल, कोळदा उपकेंद्राचे डॉ.मनिष नांद्रे, आर.ए. गावीत, कविता पाटील, राखी ठाकरे, शिलाबाई भिल उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सुनिता ठाकरे, उषाबाई भिल, गिताबाई पाठक, मंगलाबाई नाईक, मिनाबाई भिल, कस्तुरी भिल आदींनी परिश्रम घेतले.