श्रावणी येथे लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:29 IST2021-05-15T04:29:04+5:302021-05-15T04:29:04+5:30
शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती रतिलाल कोकणी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी ...

श्रावणी येथे लसीकरण शिबिर
शिबिराचे उद्घाटन आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स. सभापती रतिलाल कोकणी, तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश मावची, सरपंच मोनिका कोकणी, उपसरपंच सूरज कोकणी, डोगेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन वळवी उपस्थित होते.
लसीकरणासाठी केंद्रप्रमुख सुनीता अमृतसागर, प्राथमिक शिक्षक महेंद्र नाईक, भारती सोनवणे, राजेंद्र वसावे, मालिनी वळवी, अरुणा पाडवी, ग्रामपंचायत सदस्य नीलेश वळवी, संदीप कोकणी, राम कोकणी, तलाठी हरीश पाटील, अरविंद कोकणी, ग्रामसेवक सुरेश गावीत, आरोग्यसेविका महिमा गावीत, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती यांनी घरोघरी जाऊन जास्तीतजास्त लसीकरणाचा प्रयत्न केला. त्यामुळे एकूण ३४९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
दरम्यान, नवापूर तालुक्यातून सर्वाधिक लसीकरण करणारे श्रावणी हे पहिले गाव ठरल्याने तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सरपंच मोनिका कोकणी व इतर सर्व सदस्य व कर्मचाऱ्यांचा गौरव केला.