अंबापूर येथे पथनाट्याद्वारे लसीकरण जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:38 IST2021-06-09T04:38:04+5:302021-06-09T04:38:04+5:30
या वेळी पथनाट्य पथकातील व आष्टे केंद्रातील नांद्रे, वळवी, शिंदे, चव्हाण व जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्रा.माधव कदम यांनी ...

अंबापूर येथे पथनाट्याद्वारे लसीकरण जनजागृती
या वेळी पथनाट्य पथकातील व आष्टे केंद्रातील नांद्रे, वळवी, शिंदे, चव्हाण व जी.टी. पाटील महाविद्यालयाचे प्रा.माधव कदम यांनी स्वरचित पथनाट्य गावातील चौकांमध्ये सादर करून लसीकरणासाठी वातावरण निर्मिती केली. तसेच ग्रामस्थांच्या मनातील शंकाचे निरसन करून त्यांची मनातील भीती दूर करण्यात आली. गावातून काढण्यात आलेल्या जनजागृती रॅलीत ग्रा.पं. सदस्य श्यामू चौरे, ग्रामसेवक वेंडाईत, सरपंच पूनम बागूल, पोलीस पाटील अशोक चौरे, भरत बागूल, राजू पवार आदींसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला. पथनाट्य पथकातील कलावंतांचा जि.प. मराठी शाळा व के.डी. गावीत माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. लसीकरण जनजागृतीसाठी अंबापूर जि.प. शाळेचे मुख्याध्यापक रमेश पवार, कोकणी, वळवी, के.डी. गावीत विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.आर. पाटील, एन.सी. पाटील, सुनील दाभाडे, दीपक पाटील, सागर शर्मा, वामन महाले, राजेंद्र चौरे, मंदा वसावे, जिजाबाई कापुरे, रेशमा गावीत, अंगणवाडी सेविका सिता चौरे, आशा कार्यकर्ती रंजना महाले, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सपना हिरे व सिद्धांत खाडे यांनी तर आभार धनगर यांनी मानले.