दुर्गम भागात सोंगाड्या पार्टींद्वारे लसीकरण जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:24 IST2021-05-30T04:24:44+5:302021-05-30T04:24:44+5:30

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी यांनी लसीकरणाचे फायदे सांगितले. जीवन जगायचे असेल, परिवाराला सुरक्षित ठेवायचे ...

Vaccination awareness by Songadya parties in remote areas | दुर्गम भागात सोंगाड्या पार्टींद्वारे लसीकरण जनजागृती

दुर्गम भागात सोंगाड्या पार्टींद्वारे लसीकरण जनजागृती

या वेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी यांनी लसीकरणाचे फायदे सांगितले. जीवन जगायचे असेल, परिवाराला सुरक्षित ठेवायचे असेल तर लसीकरण करून घ्या, लसीकरण शिवाय पर्याय नाही, ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी, कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करणे गरजेचे आहे. लसीकरण महत्त्वाचा घटक आहे. आदिवासी भागात लसीकरणाविषयी गैरसमज पसरवण्यात आल्याने सोंगाड्या पार्टीचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागात शंभर टक्के लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. यासाठी आमदार पाडवी विविध उपक्रम राबवत आहेत. या वेळी जो लस घेईल त्याला दोन किलो तांदूळ, दोन किलो साखर देण्यात येईल असे सांगून लसीकरण करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा, जिल्हा परिषद सदस्या सुनीता पवार, भरत पवार, नारायण ठाकरे, भाजप शेतकरी संघटनेचे प्रवीण राजपूत, सचिन गोसावी, गौतम भिलाव, विरसिंग पाडवी, गोपाळ बागले, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, छोटू वरसाळे, किशोर जाधव, साजन शेवाळे, रवी भिलाव, रतिलाल रुपला भिलाव, वृंदावन ठाकरे, मन्या सन्या शेवाळे, जयसिंग ठाकरे, नथ्थू शेवाळे, सालम मथुर, प्रताप सुफड्या, तसेच प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यशवंत मोठे, रऊफ शेख सर्व शिक्षक वृद्ध तसेच मॉर्डन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सूर्यवंशी व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.रेखा शिंदे उपस्थित होते. आभार विजयसिंह राणा यांनी मानले.

Web Title: Vaccination awareness by Songadya parties in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.