बाेरद येथे लसीकरण जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:31 IST2021-05-10T04:31:01+5:302021-05-10T04:31:01+5:30
बोरद : तळारेदा तालुक्यातील बोरद येथे कोरोना लसीकरणाबाबत शिक्षकांकडून जनजागृती करण्यात आली. बोरद गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ...

बाेरद येथे लसीकरण जनजागृती मोहीम
बोरद : तळारेदा तालुक्यातील बोरद येथे कोरोना लसीकरणाबाबत शिक्षकांकडून जनजागृती करण्यात आली. बोरद गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ याठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत.
या अंतर्गत दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांकडून जनजागृती करण्यात आली. त्यांनी आपलं कुटुंब, आपली जबाबदारी, कोरोना त्रिसूत्रीचा वापर- हात धुवा, सॅनिटायझरचा वापर, अंतर ठेवा, लसीकरण महत्त्व याची माहिती यांनी दिली. यावेळी सरपंच वासंतीबाई ठाकरे, माजी सभापती नरहर ठाकरे, भगतसिंग वळवी, सतीश पाटील, कमल पाटील, वंदना पाटील, दादाजी वळवी उपस्थित होते. दरम्यान, शिक्षकांनी घरोघरी जाऊन लसीकरणाचे सर्वेक्षणही केले. शिक्षकांकडून गावातील पहिला व दुसरा डोस घेणा-यांची माहिती घेण्यात आली. बोरद येथे लसीकरणासह ग्रामस्थ प्रतिसाद देत असल्याची माहिती देण्यात आली.