मौलीपाडा येथे ७२ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:33 IST2021-05-20T04:33:05+5:302021-05-20T04:33:05+5:30
शिबिराचे उद्घाटन सरपंच सुमन गावित व केंद्रप्रमुख पंडित येंडाईत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील यशवंत वळवी, मनेश ...

मौलीपाडा येथे ७२ नागरिकांचे लसीकरण
शिबिराचे उद्घाटन सरपंच सुमन गावित व केंद्रप्रमुख पंडित येंडाईत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील यशवंत वळवी, मनेश वळवी, मुख्याध्यापक काशीराम वळवी, ग्रामसेवक सुरेश वसावे, तलाठी पी. डी. कुलकर्णी, डोगेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीष वळवी, डॉ. सचिन वळवी, शिक्षक विजा गावित उपस्थित होते.
या दरम्यान सहायक गटविकास अधिकारी बी. डी. गोसावी, नंदुरबारचे निवृत्त गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
शिबिरासाठी आरोग्य कर्मचारी प्रल्हाद वानखेडे, परिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.
यावेळी लसीकरण झालेल्या सर्व नागरिकांना डी.एस.सी. संस्थेतर्फे आकाश सनिसे, ज्ञानेश्वर भामरे यांनी बिस्किट व चिकीचे वाटप केले.