बोहरी समाजाच्या ५० नागरिकांचे लसीकरण १०० वर्ष च्या आजीने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:29 IST2021-05-14T04:29:59+5:302021-05-14T04:29:59+5:30

पूर्ण प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे ...

Vaccination of 50 citizens of Bohari community by a 100 year old grandmother | बोहरी समाजाच्या ५० नागरिकांचे लसीकरण १०० वर्ष च्या आजीने घेतली लस

बोहरी समाजाच्या ५० नागरिकांचे लसीकरण १०० वर्ष च्या आजीने घेतली लस

पूर्ण प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येत नसल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील ही भीती नष्ट व्हावी व नागरिकांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यावे यासाठी तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाकडून जनजागृती व समुपदेशनाचे कार्य मागील पंधरवड्यापासून सुरू आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून तळोदा शहरातील बोहरी समाजातील ५० व्यक्तीचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे.

यासाठी बोहरी समाजच्या मस्जिदमध्ये जाऊन लसीकरणाची उपयुक्तता व लसीकरण फायदे या बाबींविषयी प्रा. योगेश सोनवण, प्रा. रामचंद्र परदेशी प्रबोधन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात बोहरी समाजातील ५० नागरिकांनी लसीकरण केले. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटिल, विशाल चौधरी, तुषार चौधरी, विजय चौधरी यांनी सहकार्य केले.

Web Title: Vaccination of 50 citizens of Bohari community by a 100 year old grandmother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.