विखरण येथे ३५४ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:23 IST2021-05-28T04:23:00+5:302021-05-28T04:23:00+5:30

या वेळी सरपंच छायाबाई बापू पाटील, ग्रामसेवक एस.डी‌. गायकवाड, लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ‌.पंकज कदम, पोलीस ...

Vaccination of 354 people at Vikharan | विखरण येथे ३५४ जणांचे लसीकरण

विखरण येथे ३५४ जणांचे लसीकरण

या वेळी सरपंच छायाबाई बापू पाटील, ग्रामसेवक एस.डी‌. गायकवाड, लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ‌.पंकज कदम, पोलीस पाटील दीपमाला पाटील, रोहिदास मराठे, बापू पाटील, आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत विखरण, श्री.आप्पासोा. आ.ध. देवरे माध्यमिक विद्यालय विखरण, रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व जि.प. शाळा विखरण यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस झालेल्या या शिबिरात ३५४ जणांनी लसीचा दुसरा डोस तर २४ जणांनी पहिला डोस घेतला. या वेळी तारादास महाराज यांनीही लसीकरण करून घेतले. शिबिराला प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ‌.राहुल चौधरी व खोंडामळीचे केंद्रप्रमुख संजय कुवर यांनी भेट दिली व प्रत्यक्ष लसीकरण कामकाजाची पाहणी केली. लहान शहादे आरोग्य केंद्रातील रेखा बाविस्कर, जयश्री कानडे, कल्पना गोसावी, आरोग्य सेवक पी.जी. ब्राम्हे, हीना वळवी, गटप्रवर्तक सरला अहिरे यांनी लसीकरणाचे कामकाज पाहिले. लसीकरण मोहिमेसाठी उपसरपंच सुनीता चंदू पवार, ग्रा.पं. सदस्या निर्मला रोहिदास मराठे, ईश्वर शिवाजी मराठे, सुमन सुरेश मराठे, दिलीप नागो पाटील, भारती केशव पाटील, धर्मा पंडीत भिल, उखडीबाई कृष्णा भिल, ग्रामपंचायत कार्यालयातील सर्व कर्मचारी, किशोर साळुंके,केशव पाटील, भास्कर पाटील, जलसुरक्षक महादू भील, विलास भील, रवींद्र पाटील, सुरेश मराठे, राहुल पाटील, विनोद कुंभार, आशा कार्यकर्ती माधुरी पाटील, रत्‍नाबाई पाटील व ग्रामस्थांनी सहकार्य केले. देवरे विद्यालयाचे शिक्षक के.पी. देवरे, डी.बी. भारती, एम.डी. नेरकर, वाय.डी. बागूल, आर.एम. पाटील, एस.जी. पाटील, एम.आर. भामरे, जि.प. शाळेचे शिक्षक एस.एस. बोरसे, जयश्री सैंदाणे यांनी लसीकरण व ऑनलाइन नोंदणीसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Vaccination of 354 people at Vikharan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.