मडकानी येथे ३३ जणांना लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST2021-05-10T04:30:03+5:302021-05-10T04:30:03+5:30
यावेळी सरपंच प्रल्हाद पवार, उपसरपंच एकनाथ धानका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील रवींद्र भिल, फत्तेपूर येथील प्राथमिक उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ...

मडकानी येथे ३३ जणांना लसीकरण
यावेळी सरपंच प्रल्हाद पवार, उपसरपंच एकनाथ धानका, ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील रवींद्र भिल, फत्तेपूर येथील प्राथमिक उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अकबर पठाण, जिल्हा परिषद मराठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पवार, मुख्याध्यापक अमृत पाटील, संजय साळी, संगणकतज्ज्ञ अशोक बागले, नथुसिंग पवार, शीलदार पावरा, तलाठी सुनीता साळुंखे, ग्रामसेवक तुषार कन्हैया उपस्थित होते.
लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुसुमवाडा येथील एस. बी. धनराय, एस. के. येडवे, संगीता बर्डे, आशा सेविका, मडकानी येथील सुनीता ठाकरे, अंगणवाडी सेविका यांचे सहकार्य लाभले.
दरम्यान ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत कोरोनाशी लढा देण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनावर विजय मिळवायचा असेल तर लस घ्या सुरक्षित राहा, असे आवाहन करण्यात आले.