जयनगर येथे २४५ जणांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:53+5:302021-08-29T04:29:53+5:30

गावातील उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसऱ्या डोसचा ...

Vaccination of 245 persons at Jayanagar | जयनगर येथे २४५ जणांचे लसीकरण

जयनगर येथे २४५ जणांचे लसीकरण

गावातील उर्वरित नागरिकांच्या लसीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने वडाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसऱ्या डोसचा कालावधी झालेल्यांसाठी व पहिला डोस राहिलेल्या लोकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला ज्या व्यक्तींचा दुसऱ्या डोसचा कालावधी झाला होता. त्यांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण १४९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. तर उरलेल्या ९६ लसीचे डोस ज्या व्यक्तींनी पहिला डोस घेतला नव्हता, त्यांना देण्यात आला. शिबिरासाठी वडाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कम्युनिटी आरोग्य अधिकारी महेंद्र पाटील, परदेशी नाना, आरोग्यसेविका एस.बी. इंगळे, आशा सेविका ज्योती पाटील, नीलिमा वसावे, जिल्हा परिषद शिक्षक विजय राजपूत, राजेंद्र भोई, फुलवती वसावे व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Vaccination of 245 persons at Jayanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.