इटवाई येथे १२५ नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST2021-06-17T04:21:23+5:302021-06-17T04:21:23+5:30
शिबिराचे उद्घाटन ९० वर्षीय गिमजी सुपड्या गावीत व माजी सरपंच रविश वळवी यांना लस देऊन करण्यात आले. ४ जूनरोजी ...

इटवाई येथे १२५ नागरिकांचे लसीकरण
शिबिराचे उद्घाटन ९० वर्षीय गिमजी सुपड्या गावीत व माजी सरपंच रविश वळवी यांना लस देऊन करण्यात आले. ४ जूनरोजी तालुक्यातील १० टक्क्यांपेक्षा कमी लसीकरण असलेल्या गावांच्या मुख्याध्यापकांची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी बोलाविली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण वाढविण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने इटवाई येथे लसीकरण शिबिर घेण्यात येऊन १९८ पैकी १२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी सरपंच देवा कोकणी, उपसरपंच वीरसिंग वळवी, पोलीसपाटील संतोष कोकणी, केंद्रप्रमुख सुनीता अमृतसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वळवी, ग्रामसेवक भामरे, मुख्याध्यापक हेमंत वळवी, वीरसिंग गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी ढोंग येथे ४३६ पैकी २९० नागरिकांचे लसीकरण झाल्याची माहिती देण्यात आली.
शिबिरासाठी ग्रामपंचायत सदस्य सुनील गावीत, अविनाश वळवी, मीनाक्षी वळवी, किरण गावीत, जगदीश गावीत, शर्मिला गावीत, सुमन कोकणी, किल्लूबाई गावीत, इंदुबाई गावीत, अविनाश कोकणी, आरोग्यसेविका सविता कोकणी, कविता गावीत, सुनंदा गावीत, कल्पना कोकणी, ढोंगचे शिक्षक जयश्री भामरे, धीरज खैरनार, राजेंद्र कुंभार, कनिलाल कोकणी, इटवाईच्या जयश्री जोशी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, संजीत गावीत, इंद्रजित गावीत, दाविद गावीत व राकेश गावीत आदींनी परिश्रम घेतले.