समाजकार्य महाविद्यालयाच्या समुपदेशनाने बोहरी समाजाच्या लसीकरण शिबिरात १०० वर्षांच्या आजीने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:57+5:302021-05-19T04:31:57+5:30

कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे ...

Vaccination by 100 year old grandmother at Bohari community vaccination camp with counseling from social work college | समाजकार्य महाविद्यालयाच्या समुपदेशनाने बोहरी समाजाच्या लसीकरण शिबिरात १०० वर्षांच्या आजीने घेतली लस

समाजकार्य महाविद्यालयाच्या समुपदेशनाने बोहरी समाजाच्या लसीकरण शिबिरात १०० वर्षांच्या आजीने घेतली लस

कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येत नसल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील ही भीती नष्ट व्हावी व नागरिकांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यावे यासाठी तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाकडून जनजागृती व समुपदेशनाचे कार्य मागील पंधरवड्यापासून सुरू आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून तळोदा शहरातील बोहरी समाजातील ५० व्यक्तींचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे.

यासाठी बोहरी समाजाच्या मस्जिदमध्ये जाऊन लसीकरणाची उपयुक्तता व लसीकरणाचे फायदे आदींविषयी प्रा. योगेश सोनवणे, प्रा. रामचंद्र परदेशी यांनी प्रबोधन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गुरुवारी (दि. १३) उपजिल्हा रुग्णालयात बोहरी समाजातील ५० नागरिकांनी लसीकरण केले. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, विशाल चौधरी, तुषार चौधरी, विजय चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी मुल्ला मुर्तूजा हामिद बोहरी, हासिम बोहरी, नुरुद्दीन बोहरी, शबू बोहरी, जैनुल मर्चंट, मोयज बोहरी, वजफा बोहरी, हुमेद बोहरी, आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination by 100 year old grandmother at Bohari community vaccination camp with counseling from social work college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.