सोनवल येथे १०० जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST2021-05-17T04:29:21+5:302021-05-17T04:29:21+5:30

शहादा : तालुक्यातील सोनवल. त. बो. लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. कलसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १०० जणांना लस ...

Vaccination of 100 people at Sonwal | सोनवल येथे १०० जणांना लस

सोनवल येथे १०० जणांना लस

शहादा : तालुक्यातील सोनवल. त. बो. लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. कलसाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १०० जणांना लस देण्यात आली. यावेळी डॉ. नितीन राठोड, आरोग्यसेवक प्रमोद कोळी, आरोग्यसेविका वैशाली पवार, ग्रामसेविका कविता शिंदे, पोलीस पाटील गोरखमोरे आदींची उपस्थिती होती. लसीकरणाबाबत गावात जनजागृती करण्यात आली. गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत हा उपक्रम घेण्यात आला.

गोरंबा येथे लसीकरण शिबिर

वाण्याविहीर : धडगाव तालुक्यातील गोरंबा येथे आरोग्य उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. लसीकरणास गोरंबा येथील व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. तेलखेडी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले. गटविकास अधिकारी गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष पावरा, पोलीस पाटील पूजा कोमलसिंग पाडवी, कोमलसिंग सुन्या पाडवी, हारसिंग पाडवी, ग्रामपंचायत सदस्य हिरा काळूसिंग पाडवी, मोहन भाऊसाहेब भोसले, आरोग्य सहायक ए.एम. बुवा, आरोग्यसेवक एन.बी. पावरा, आरोग्यसेविका ए.एम. ठाक, मांगीलाल जाधव, आरोग्य परिचर, अंकिता पावरा आरोग्यसेविका, दिना वसावे आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका मोगी सुऱ्या तडवी, शकुंतला वळवी, मीना रवींद्र पाडवी, इंदिरा रणमलसिंग वळवी, हिरा किसान पटले, लीला सुमन पटले आदी उपस्थित होते.

Web Title: Vaccination of 100 people at Sonwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.