वृक्षांकरीता बांबूपासून निर्मित संरक्षण जाळीचा उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 15:16 IST2020-01-20T15:16:14+5:302020-01-20T15:16:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : वाल्हेरी येथे तळोदा वनक्षेत्रांतर्गत राबविण्यात आलेल्या रोपवनातील वृक्षांना बांबुच्या कामठ्यांपासून तयार करण्यात आलेल्या संरक्षण ...

वृक्षांकरीता बांबूपासून निर्मित संरक्षण जाळीचा उपयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : वाल्हेरी येथे तळोदा वनक्षेत्रांतर्गत राबविण्यात आलेल्या रोपवनातील वृक्षांना बांबुच्या कामठ्यांपासून तयार करण्यात आलेल्या संरक्षण जाळ्या लावण्यात आले आहे. या उपक्रमाचे खान्देशातून कौतुक केले जात आहे.
या कुंपनास लोखंडी व प्लास्टीकच्या कुंपनापेक्षा कमी खर्च लागत असून, पर्यावरण पूरक असे हे संरक्षण कुंपन आहे. हे कुंपन लावल्यामुळे जनावरांपासून त्याचे संरक्षणही होत आहे. त्यामुळे वृक्षांच्या वाढीसही त्यापासून फायदा होत आहे.
हा उपक्रम मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक एस.बी. केवटे, सहाय्यक वनसंरक्षक ई.बी. चौधरी यांच्या प्रयत्नाने राबविण्यात आला होता.