अक्कलकुवा येथील उरूस यंदा कोरोनामुळे स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST2021-01-25T04:32:45+5:302021-01-25T04:32:45+5:30

अक्कलकुवा येथे दरवर्षी पहेलवान बाबा व हकामअली बाबा यांच्या दर्ग्यावर उरूस भरविण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी ...

Urus at Akkalkuwa postponed this year due to corona | अक्कलकुवा येथील उरूस यंदा कोरोनामुळे स्थगित

अक्कलकुवा येथील उरूस यंदा कोरोनामुळे स्थगित

अक्कलकुवा येथे दरवर्षी पहेलवान बाबा व हकामअली बाबा यांच्या दर्ग्यावर उरूस भरविण्यात येतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. याअंतर्गत अक्कलकुवा पोलीस ठाण्याकडून उरूस कमेटी सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची बैठक झाली. यावेळी कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी हा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्सवाची परंपरा कायम राहावी यासाठी साध्या पद्धतीने २० ते २५ भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करून सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, पृथ्वीराज रघुवंशी, हाजी महंमद हुसेन मक्राणी, पंचायत समितीचे माजी उपसभापती इंद्रपालसिंह राणा, मुसाफिर बाबा, अब्दुल समद बद्राउद्दिन, रजनीकांत वाणी, अब्दुल गनी अब्दुल माजिद खान, महमद हुसेन गुलाम हुसैन, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Urus at Akkalkuwa postponed this year due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.