जिल्ह्यात बेमोसमी पावसाच्या सरींनी उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:42 IST2019-11-08T12:41:56+5:302019-11-08T12:42:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात ...

Unseasonal rains flooded the district | जिल्ह्यात बेमोसमी पावसाच्या सरींनी उडाली तारांबळ

जिल्ह्यात बेमोसमी पावसाच्या सरींनी उडाली तारांबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अवकाळी पावसाने पुन्हा दणका दिल्याने शेतमाल वाचविण्यासाठी शेतक:यांची एकच धांदल उडाली. जिल्ह्यातील अनेक भागात मध्यम तर काही भागात तुरळक पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. परिणामी गेल्या तीन ते चार दिवसांपासून उकाडा आणि ऊनमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. दरम्यान, येत्या 24 तासात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे शेती नुकसानीच्या पंचनाम्यांना काहीसा व्यत्यय आला.
जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होते. दुपार्पयत अनेक भागात मध्यम ते तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी आणि शेतक:यांनीही आधीच उपाययोजना करून ठेवलेल्या होत्या. असे असले तरी या पावसामुळे अनेक भागात शेतमाल वाचविण्यासाठी कसरत झाल्याचे दिसून आले. 
शेतमाल झाकण्यासाठी धावपळ
शेतांमध्ये सध्या सोयाबीन, मका, बाजरी काढून ठेवण्यात आली आहे. दोन आठवडय़ांपूर्वी झालेल्या पावसात त्याचे नुकसान झालेले होते. जेमतेम आता काही अंशी त्यातील उत्पादन मिळणार असल्यामुळे ते पावसापासून वाचविण्यासाठी शेतक:यांची धावपळ उडाली. काहींनी आधीच हे पीक मळणी करून घरात ठेवले. परंतु कापूस, मिरची, पपई या पिकांना या पावसाचा फटका बसणार आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शेतक:यांमध्ये भितीचे वातावरण आहेच. परंतु चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्याने अतिवृष्टीची शक्यताही कमी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला आहे.
धान्य व मिरचीचे नुकसान
बाजार समितीत सध्या खरीप धान्याची आवक ब:यापैकी सुरू आहे. मिरचीची आवक देखील सुरू झाली असून ती वाळविण्यासाठी पथारींवर टाकली जात आहे. अशातच पावसाची रिपरिप सुरू असल्याने धान्य वाचविण्यासाठी व्यापा:यांची धावपळ उडाली. ताडपत्रीद्वारे झाकून आणि काही व्यापा:यांनी थेट शेडमध्ये धान्य ठेवून पावसापासून वाचविण्याचा प्रय} केला.
जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमान वाढले होते. उकाडा देखील वाढला होता. ऑक्टोबर हिटचा अनुभव नोव्हेंबर महिन्यात येत होता. परंतु गुरुवारी सकाळपासूनच पावसाच्या तुरळक सरी आणि ढगाळ वातावरण यामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.


जिल्ह्यातील नुकसानीचा पंचनाम्याचे काम सुरू असताना पुन्हा 6 व 7 नोव्हेंबर रोजी पाऊस झाला. या पावसामुळे पंचनाम्याच्या कार्यात व्यत्यय आला असला तरी कुठलाही बाधित शेतकरी सुटणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. तर झालेल्या पंचनाम्यांचे चावडीवाचन करण्यासाठी दवंडीद्वारे संदेश द्यावा, जिल्ह्यात पंचनामा केलेल्या शेतीचा संयुक्त अहवाल कृषी विभागाकडे सादर करण्याचे आवाहन देखील डॉ.भारुड यांनी केले.
 

Web Title: Unseasonal rains flooded the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.