शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेत विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विषय समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांचा सहभाग असावा किंवा नसावा या मुद्द्यावरुन पालिकेच्या सभेत वाद झाला़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विषय समित्यांमध्ये स्विकृत सदस्यांचा सहभाग असावा किंवा नसावा या मुद्द्यावरुन पालिकेच्या सभेत वाद झाला़ पिठासीन निवडणूक निर्णय अधिकारी वसुमना पंत यांनी तात्काळ निर्वाळा दिल्यानंतर विषय समित्यांचे सभापती आणि सदस्य यांची बिनविरोध निवड झाली़नगरपालिकेच्या विषय समित्यांचे सभापती निवडीच्या प्रक्रियेसाठी मंगळवारी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी सभा बोलावण्यात आली होती़ यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या़ व्यासपीठावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी, मुख्याधिकारी डॉ़ बाबूराव बिक्कड, उपनगराध्यक्षा भारती राजपूत यांची उपस्थिती होती़प्रारंभी निवडणूक निर्णय अधिकारी पंत यांनी सभापती पदासाठी अर्ज करणाऱ्या सभासदांची माहिती दिली़ यानंतर त्यांनी सभेत सहा समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर केले़ निवडीप्रसंगी सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक उपस्थित होते़निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय विभाग प्रमुख संजय माळी, दिपक पाटील, मोतीराम मराठे यांनी परिश्रम घेतले़ निवडीनंतर समर्थकांनी परिसरात फटाके फोडून तसेच ढोलताशांचा गजर करत आनंद व्यक्त केला़ निवड झालेल्या सभापतींची आमदार कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली़ यात कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी होते़