तिलालीच्या सरपंचपदी वंदना सावंत यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:58+5:302021-02-17T04:37:58+5:30
तिलाल ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ...

तिलालीच्या सरपंचपदी वंदना सावंत यांची बिनविरोध निवड
तिलाल ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा घेण्यात आली. यावेळी सर्व नऊ सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी ए.जे. वळवी यांच्या उपस्थितीत सरपंचपदी वंदना सावंत व उपसरपंचपदी छोटू भिल यांची निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामसेवक एस.एन. अहिरे, तलाठी एन.के. राठोड, हर्षल सावंत, गोकुळ भिल यांनी त्यांना सहकार्य केले. बिनविरोध निवडीसाठी जि.प.चे माजी उपाध्यक्ष शंकरराव मोरे, संतोष पाटील, जि.प. सदस्य प्रवीण पाटील, मधुकर पाटील, डॉ. सयाजीराव मोरे आदींनी परिश्रम घेतले. प्रा. सी.पी. सावंत, पीतांबर सावंत, विश्वास पाटील, जगन पाटील, बी.बी. सावंत, मुरलीधर सावंत, पोलीस पाटील रमेश पवार, नागो सावंत, प्रा.ए.के. सावंत व ग्रामस्थ उपस्थित होते. तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील व सहायक पोलीस निरीक्षक ई.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.