लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदिवासी संशोधन केंद्राचे काम लवकर सुरू करण्यात यावे आणि विद्यापीठाचे उपकेंद्र नंदुरबार येथे सुरू करण्यासाठी प्रशासनाने जागा त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.विद्यापीठाचे उपकेंद्र आणि आदिवासी संशोधन केंद्रासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप पाटील, कार्यकारी अभियंता एस.आर.पाटील, पवार, भाजपचे जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते. आदिवासी सांस्कृतिक भवन उभारतांना अधिक लोकसंख्येच्या गावांना प्राधान्य देण्यात यावे. उपकेंद्र आणि संशोधन केंद्र एकाच परिसरात उभारण्यात येईल यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. उपकेंद्रासाठी जागा मिळेपयर्ंत संशोधन केंद्राच्या इमारतीत उपकेंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने प्रय} करण्यात यावा, असेही रावल यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद मिलींद खैरनार यांच्या वीरप}ी हर्षदा खैरनार यांना दोन हेक्टर शेतीचा सातबारा सुपूर्द करण्यात आला.बैठकीनंतर पालकमंत्र्यांनी अधिका:यांसह आदिवासी संशोधन केंद्राच्या नियोजित जागेची पाहणी केली.
विद्यापीठ उपकेंद्रांसाठी जागा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 12:59 IST