आदिवासींच्या ‘टॅलेंट’ला प्रोत्साहन देणारी अनोखी चळवळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 13:22 IST2018-08-09T13:22:44+5:302018-08-09T13:22:49+5:30
टीटीएसएफ फाऊंडेशन : वाढदिवस आणि पुण्यतिथीनिमित्ताने देणगी देण्याची रुढ झाली प्रथा

आदिवासींच्या ‘टॅलेंट’ला प्रोत्साहन देणारी अनोखी चळवळ !
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासींचे दु:ख आणि समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबविल्या जात असल्या तरी समाजातील गुणवंत विद्याथ्र्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देवून त्याला शासकीय सेवेत अधिकारी बनविण्यासाठी स्थापन झालेली टीटीएसएफ ही संस्था आता अधिकच मजबूत होत आहे. विशेषत: या संस्थेच्या निमित्ताने लगA सोहळा, वाढदिवसानिमित्त देणगी देण्याची आदर्श पायंडा आदिवासी समाजात सुरू झाला आहे.
आदिवासींच्या विकासातील मुख्य अडसर शिक्षण आहे. आदिवासींमधील साक्षरता आजही चिंतेचा विषय आहे. शासनाने आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी योजनांमधील त्रुटी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अशाही स्थितीत अनेक आदिवासी तरुण प्रतिकुल परिस्थितीतही शिक्षणासाठी धडपड करीत आहेत. आदिवासी विद्याथ्र्यामध्ये गुणवत्ताही अधिक असली तरी या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य असे व्यासपीठ नाही. या युवकांना योग्य मार्गदर्शनही नाही. त्यामुळे गुणवत्ता असली तरी विद्याथ्र्याचे करियर घडविण्यासाठी पाठबळ व व्यासपीठ नसल्याने अनेक आदिवासी युवक शिक्षण घेवून बेरोजगारीची शिक्षा भोगत आहेत.
गेल्या चार, पाच वर्षात राज्यात प्रथमच अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून संघर्ष करीत डॉ.योगेश भरसळ, डॉ.राजेंद्र भारूड, अजय खर्डे यासारखे तरुण आयएएस, युपीएससी या स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत. त्यांचीच प्रेरणा घेत नव्हे तर मार्गदर्शनानुसार नंदुरबार जिल्ह्यातील काही आदिवासी अधिका:यांनी आदिवासी विद्याथ्र्यामधील गुणवत्ता शोधून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व त्यांचे करियर घडवावे यासाठी ट्रायबल टॅलेंट सर्च फाऊंडेशन अर्थात टीटीएसएफची स्थापना करून गेल्या दोन वर्षापासून एक अभिनव चळवळ राबवीत आहे.
या फाऊंडेशनच्या माध्यमातून आदिवासी विद्याथ्र्यासाठी खास प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेतून विद्याथ्र्याची गुणवत्ता शोधली जाते. व त्यातील 30 विद्याथ्र्याना एमपीएससी, युपीएससी परिक्षेसाठी सर्व तयारीकरीता पाठविले जाते. त्याचा सर्व खर्च फाऊंडेशन उचलते. गेल्या दोन वर्षात या उपक्रमाला यश आले आहे.
फाऊंडेशनतर्फे सर्व द:याखो:यातील धडपडणा:या विद्याथ्र्यासाठी खास मार्गदर्शन मेळावेही घेतले जाते. त्यासाठी डॉ.राजेंद्र भारूड, डॉ.योगेश भरसळ, अजय खर्डे हे मार्गदर्शनासाठी येतात. यावर्षी देखील येत्या 16 सप्टेंबरला असामेळावा होणार असून त्याला मार्गदर्शनासाठी आतार्पयत सर्वात कमी वयात आएएस झालेले दिल्ली येथील अन्सार शेख येणार आहेत. अतिशय प्रतिकुल परिस्थितीत त्यांनी यश संपादन केले आहे.
या फाऊंडेशनला मजबूत करण्यासाठी आदिवासी समाजातून मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पाठबळही मिळत आहे. एका माजी अधिका:याने आपल्या मुलीच्या लगAात देणगी जाहीर केल्यानंतर लन्नसमारंभातूनही देणगी देण्याची प्रथा सुरू झाली. काही लोक आपल्या घरच्या कुठल्याही कार्यात बचत करून देणगी देतात. काही वाढदिवसाच्या निमित्ताने काही आपल्या पुर्वजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने या फाऊंडेशनला देणगी देवून आर्थिक मदत करीत आहेत. या देणगी रुपातून जवळपास नऊ लाखाच्या आसपास निधी मिळाला असल्याची माहिती या संस्थेचे विश्वस्त ङोलसिंग पावरा यांनी दिली.