रस्ता दुरवस्थेकडे दुर्लक्षामुळे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:34 IST2019-07-30T12:34:45+5:302019-07-30T12:34:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी ...

रस्ता दुरवस्थेकडे दुर्लक्षामुळे अनोखे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार तक्रारी करुनही राष्ट्रीय महामार्ग निर्माण विभागाचे दुर्लक्ष असून अक्कलकुवा शिवसेनेतर्फे पुलावर वृक्षारोपण करुन रोष व्यक्त करण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासून नेत्रंग-शेवाळी या महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. मात्र संबंधित विभागाच्या कामचुकार व सुस्तावलेल्या अधिका:यांना याचे सोयरसूतक नाही. याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर दुरुस्ती करण्यात येऊन लाखो रुपयांची बिले काढली जातात. संबंधित विभागाला जाग न आल्यामुळे सोमवारी तालुका शिवसेनेच्या कार्यकत्र्यानी अक्कलकुवा येथील वरखेडी नदीच्या पुलावरील जिवघेण्या खड्डय़ांमध्ये वृक्षारोपण करुन संबंधित विभागाचा व नाकत्र्या अधिका:यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करुन आंदोलन केले. या वेळी कार्यकत्र्यानी घोषणाबाजी करत प्रशासनाविरुद्ध आपला राग व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडिले, तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, युवा सेना उपाध्यक्ष रोहित चौधरी, तालुका उपप्रमुख तुकाराम वळवी, तापसिंग वसावे, शहर प्रमुख रावेंद्रसिंग चंदेल, मोरंबाचे सरपंच ईश्वर तडवी, काकरखुंटचे सरपंच विनोद वळवी, उपसरपंच दिजू वळवी, शहर उपप्रमुख जितेंद्र लोहार, युवा सेना शहर प्रमुख भावेश कुंभार, स्वप्निल जैन, कुमारपाल जैन, राजू पाडवी, केतन वाडिले, विपुल शिंपी यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.