केंद्रीय मंत्री जावडेकरांंनी घेतला जिल्ह्याचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 14:44 IST2020-04-29T14:44:39+5:302020-04-29T14:44:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांच्यासोबत फोनवर संपर्क करुन ...

Union Minister Javadekar took stock of the district | केंद्रीय मंत्री जावडेकरांंनी घेतला जिल्ह्याचा आढावा

केंद्रीय मंत्री जावडेकरांंनी घेतला जिल्ह्याचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये यांच्यासोबत फोनवर संपर्क करुन माहिती जाणून घेतली़ यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत कामकाजावर समाधान व्यक्त केले़
केंद्र शासनाकडून लॉकडाऊन कालावधी वाढवण्यासह काही निर्बंध शिथिल करण्याचा विचार सुरु आहे़ यांतर्गत केंद्रीय मंत्र्यांकडून देशभरात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधणे सुरु आहे़ यांतर्गत सोमवारी दुपारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत दिल्ली येथून संपर्क साधला़ यावेळी त्यांनी जिल्हा रुग्णालयात काम करत असलेल्या परिचारिका, वैद्यकीय अधिकारी यांची माहिती घेतली़ त्यांना जेवण तसेच निवास व्यवस्थेबाबत विचारणा केली़ तसेच जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव होण्याचे कारण जाणून घेतले़ याचे उत्तर देताना शल्य चिकित्सक भोये यांनी बाहेरील शहरात जाऊन आलेल्यांमुळे कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्टीकरण दिले़
लॉकडाऊन कालावधी वाढ करावी किंवा कसे याबाबतही त्यांनी चर्चा केली़ यात जिल्हा शल्य चिकित्सकांनी किमान २८ दिवस कालावधी वाढवला पाहिजे असे सांगून शहरी भागातील कंटेन्मेंट झोन तसेच आरोग्य विभागाकडून होणाºया तपासण्या याची माहिती दिली़ सोबत लॉकडाऊन काळ वाढल्यास केसेस वाढणार नसल्याचेही त्यांनी सांगितले़ केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी जिल्हा रुग्णालय करत असलेले काम योग्य असल्याचा निर्वाळा देत आरोग्य विभागाचे कौतूक केले़

चर्चेदरम्यान जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी परिचारिका व वैद्यकीय अधिकारी यांची व्यवस्था स्वखर्चाने करत असल्याची माहिती देण्यात आली़ या माहितीवर जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे़ दरम्यान याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ भोये यांना संपर्क केला असता, सोमवारपर्यंत रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जेवणासाठी खर्च करत होते़ परंतू मंगळवारपासून हा खर्च जिल्हा प्रशासन करत आहे़ शिवभोजन थाळी केंद्रातून सर्वांना मोफत जेवण देण्यास सुरुवात झाली असल्याचा खुलासा त्यांच्याकडून करण्यात आला आहे़

Web Title: Union Minister Javadekar took stock of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.