मोटारसायकलीला अज्ञात वाहनाची धडक; दोन युवक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST2021-06-16T04:40:25+5:302021-06-16T04:40:25+5:30
पोलीस सूत्रांनुसार, सौरव राजेंद्र चौधरी (२३) व राजेश महाले (२४, दोन्ही रा.मोहाडी, धुळे) हे गुजरात राज्यातील व्यारा येथील त्यांची ...

मोटारसायकलीला अज्ञात वाहनाची धडक; दोन युवक गंभीर
पोलीस सूत्रांनुसार, सौरव राजेंद्र चौधरी (२३) व राजेश महाले (२४, दोन्ही रा.मोहाडी, धुळे) हे गुजरात राज्यातील व्यारा येथील त्यांची आत्या रंजना नेरकर यांच्याकडे कामानिमित्ताने गेले होते. मोटारसायकलीने (क्रमांक एम.एच.४१ यू-४५५४) व्याराहून धुळ्याकडे जात असताना नवापूर शहरातील हॉटेल मानसजवळ सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास अज्ञात वाहनाने मोटारसायकलीला समोरून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. दोन्ही मोटारसायकलस्वार रस्त्यावर जोरदार फेकले गेल्याने रक्तरंजित झाले. यात मोटारसायकलीचे मोठे नुकसान झाले. वाहनचालक धडक देऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे. नवापूर पोलीस वाहनाचा शोध घेत आहेत. जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती स्थिर आहे. नवापूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.