दोन आठवड्याच्या आतच दोघा भावांचा दुर्दैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:19 IST2021-07-05T04:19:24+5:302021-07-05T04:19:24+5:30
तळोदा तालुक्यातील झिरी येथील माजी आ. अर्जुनसिंग वळवी यांचा मुलगा डाॅ. हिंमत वळवी यांचा दोन आठवड्यांपूर्वी सुरत येथे ...

दोन आठवड्याच्या आतच दोघा भावांचा दुर्दैवी मृत्यू
तळोदा तालुक्यातील झिरी येथील माजी आ. अर्जुनसिंग वळवी यांचा मुलगा डाॅ. हिंमत वळवी यांचा दोन आठवड्यांपूर्वी सुरत येथे खाजगी रुग्णालयात दाखल असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अक्कलकुवा तालुक्यातील होराफळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणारे हिंमत वळवी हे मनमिळाऊ आणि हुशार असे डाॅक्टर म्हणून परिचरित होते. गेल्या काही वर्षांत अक्कलकुवा व धडगाव तालुक्यांतील दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅ. हिंमत वळवी यांना होराफळी येथे कर्तव्य बजावत असताना कोरोना व त्यानंतर म्युकरमायकोसिसचा त्रास झाला होता. यातून सावरल्यानंतर त्यांच्यावर सुरत येथे उपचार सुरू असताना १९ जून रोजी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. दरम्यान त्यांच्या अंत्यविधीला दोन आठवडे उलटल्यानंतर व्यवसायाने शिक्षक असलेला त्यांचा धाकटा भाऊ अभिमन्यू वळवी यांचेही दोन जुलै रोजी कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. दोन जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. दोघा भावांचा दोन आठवड्यांच्या आताच मृत्यू झाल्याने तळोदा व अक्कलकुवा ताुलक्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.