कोरोनाच्या प्रभावाने कोविड सेंटर्स पुन्हा झाले सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:33 IST2021-02-24T04:33:05+5:302021-02-24T04:33:05+5:30
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात एकाच ठिकाणी दोन इमारतीत १२० जणांच्या क्षमतेचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सोबत ...

कोरोनाच्या प्रभावाने कोविड सेंटर्स पुन्हा झाले सुरु
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरात एकाच ठिकाणी दोन इमारतीत १२० जणांच्या क्षमतेचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सोबत शहादा, नवापूर, तळोदा येथेही कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास प्रकृती स्थिर असलेले तसेच लक्षणे नसलेल्यांना या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयात सध्या १७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ज्यांची प्रकृती सुधारली आहे अशांना कोविड सेंटरमध्ये पाठवले जाते.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. या सेंटर्समधून उपचार देण्यावर भर देण्यात येत आहे. ज्या रुग्णांना लक्षणे नसतील अशा रुग्णांनाच कोविड केअर सेंटर्समध्ये ठेवण्यात येत आहे. अद्याप रुग्णांच्या संख्येनुसार आपल्याकडे बेड उपलब्ध असल्याने अडचणी आलेल्या नाहीत. येत्या काळात अडचणी वाढल्यास सेंटर्स वाढवू
-डाॅ. एन.डी.बोडक,
जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार.
शहादा व नंदुरबारात रुग्ण संख्येत वाढ
जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे तीन हजार ६५४ रुग्ण हे शहादा शहर व तालुक्यात तर त्याखालोखाल तीन हजार ५६८ रुग्ण हे नंदुरबार शहर व तालुक्यात आढळून आले आहेत.
सध्याही उपचार घेत असलेल्या रुग्णात या दोन्ही ठिकाणांच्या रुग्णांचा समावेश आहे. यात नंदुरबार ८८ तर शहाद्याचे ४७ रुग्ण आहेत.