वाघाळे येथे पुतण्याने केला काकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 12:18 IST2019-10-30T12:18:28+5:302019-10-30T12:18:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून दोघा भावांमध्ये हाणामारी सुरु असताना त्यातील एकाच्या ...

Uncle's uncle murdered at Waghale | वाघाळे येथे पुतण्याने केला काकाचा खून

वाघाळे येथे पुतण्याने केला काकाचा खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील वाघाळे येथे शेतीच्या हिस्से वाटणीच्या वादातून दोघा भावांमध्ये हाणामारी सुरु असताना त्यातील एकाच्या मुलाने काकाच्या डोक्यात स्क्रू-ड्रायव्हर खुपसत खून केल्याची घटना घडली आह़े सोमवारी रात्री आठ वाजता गावातील हनुमान मंदिर चौकात ही घटना घडली़ 
मेवालाल देवचंद चौरे (50) असे मयताचे नाव असून याप्रकरणी पोलीसांनी तिघांना ताब्यात घेतले आह़े वाघाळे येथील मणिलाल देवचंद चौरे व मेवालाल देवचंद चौरे या दोघा भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणीचा वाद होता़ दरम्यान सोमवारी दोघांमध्ये गावातील हनुमान चौकात वाद झाला़ यावेळी मणिलाल याने मेवालाल यांना बेदम मारहाण करत जखमी केल़े दरम्यान मणिलाल याची दोन्ही मुले रविंद्र आणि भास्कर ही दोन्हीही घटनास्थळी हजर होत़े यावेळी दोघांनीही मेवालाल यांना मारहाण करत शिवीगाळ केली़ यातच भास्कर चौरे याने हातातील स्कू-ड्रायव्हर मेवालाल यांच्या कानाखाली खूपसून गंभीर दुखापत केल्याने त्यांचा मृत्यू झाला़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी वाघाळे येथे पोलीस अधिका:यांसह भेट देत परिस्थिती आढावा घेतला़  पोलीसांनी मणिलाल, रविंद्र आणि भास्कर या तिघांनाही अटक केली आह़े याप्रकरणी अंबालाल देवचंद चौरे रा़ वाघाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौरे पिता-पुत्रांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे करत आहेत़ 
 

Web Title: Uncle's uncle murdered at Waghale