प्रकाशा येथील शासकीय कार्यालयांच्या परिसरात अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:37 IST2021-06-09T04:37:57+5:302021-06-09T04:37:57+5:30
प्रकाशा येथे गुणनियंत्रण उपविभाग प्रकाशा, पाटबंधारे उपविभाग प्रकाशा, पाटबंधारे उपविभाग शहादा, तापी जल विद्युत उपविभाग प्रकाशा, जलसंधारण उपविभाग प्रकाशा, ...

प्रकाशा येथील शासकीय कार्यालयांच्या परिसरात अस्वच्छता
प्रकाशा येथे गुणनियंत्रण उपविभाग प्रकाशा, पाटबंधारे उपविभाग प्रकाशा, पाटबंधारे उपविभाग शहादा, तापी जल विद्युत उपविभाग प्रकाशा, जलसंधारण उपविभाग प्रकाशा, लघुपाटबंधारे उपविभाग तळोदा (प्रकाशा) ही कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांमध्ये जवळपास ७० कर्मचारी याठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, ही कार्यालये बेवारस स्थितीत असल्यासारखी स्थिती झाली आहे. या कार्यालयांच्या परिसराची देखभाल, स्वच्छता व सुरक्षेसाठी एकही चौकीदार किंवा कर्मचारी नसल्याने येथे कोणीही येतो व जातो अशी स्थिती आहे. अस्वच्छता व झाडे-झुडपे वाढल्याने वराहांचा वावरही वाढला आहे. याठिकाणी चौकीदार नसल्याने अधूनमधून येथील झाडे तोडली जातात. येथे वरिष्ठ अधिकारी भेटी देतात. मात्र, त्यांच्याही निदर्शनास ही बाब येत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
कार्यालयांचे भाडे थकले
प्रकाशा येथे ज्या जागेवर ही कार्यालये आहेत, ती जागा शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. या कार्यालयांसाठी ही जागा भाडेत तत्त्वावर देण्यात आली. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीला भाडे मिळत नाही. यासंदर्भात बॅरेज प्रशासनाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमचे मुख्य कार्यालय धुळे येथे आहे. तेथूनच आम्हाला भाड्याची रक्कम येत नाही तर आम्ही देणार कशी, असे सांगण्यात आले.