दरा शिवारात चारचाकी वाहनातून दीड लाख रुपयांचे अवैैध डिंक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 11:47 IST2019-05-03T11:47:13+5:302019-05-03T11:47:37+5:30
वनविभागाची कारवाई : दोघांना अटक

दरा शिवारात चारचाकी वाहनातून दीड लाख रुपयांचे अवैैध डिंक जप्त
शहादा : तालुक्यातील दरा शिवारात चारचाकी वाहनातून वन विभागाच्या पथकाने कारवाई करत १०० किलो धावडी डिंक ताब्यात घेतले़ याप्रकरणी वनविभागाच्या पथकाने दोघांवर गुन्हा दाखल केला आहे़
वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना दरा भागातील पिंपळाने या भागात चारचाकी वाहनातून अवैैध डिंकची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यांनी या भागात वाहन तपासणी केली असता, एम एच ४३ -११२ या चारचाकी वाहनात चार गोण्यांमध्ये धावड जातीचे डिंक असल्याचे दिसून आले़ पथकाने राजेंद्र खात्र्या पावरा रा़ दोंदवाडा ता़ शिरपूर व लक्ष्मण दामा वसावे रा़ माजलगाव ता़ शहादा यांची विचारपूस केली़ दोघांनीही डिंक विक्रीसाठी नेत असल्याचे कबुली दिली़ डिंकाची किंमत १ लाख ५० हजार रुपये आहे़ वाहनासह चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ उपवनसंरक्षक एस़बी़ केवटे सहायक वनसंरक्षक आर्य झगडे, अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात वनपाल एस़ इंदवे, वनरक्षक धनराज पाटील, बादशहा पिंजारी, प्रवीण वाघ यांनी ही कारवाई केली़ दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे़