जामली वनक्षेत्रात अनधिकृतपणे झाडांची तोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST2021-06-04T04:23:27+5:302021-06-04T04:23:27+5:30
निवेदनात, जामली शिवारातील देवदापाड्यात सर्वे नं ३२३ मधे शेताच्या बांधावर सागाची झाडे लागवड केली होती सदर झाडे ४० इंच ...

जामली वनक्षेत्रात अनधिकृतपणे झाडांची तोड
निवेदनात, जामली शिवारातील देवदापाड्यात सर्वे नं ३२३ मधे शेताच्या बांधावर सागाची झाडे लागवड केली होती सदर झाडे ४० इंच वेडी एवढी वाढ झालेली होती. मात्र २ मे २०२१ रोजी वनसिंग जोंदा तडवी, चंद्रसिंग वनसिंग तडवी, दशरथ वनसिंग तडवी, पिंट्या वनसिंग तडवी, बारक्या जोदा तडवी, राकेश बारक्या तडवी, शांता बारक्या तडवी यांनी तोडून नेली. सदर इसम तोडताना सुभाष तडवी यांच्या आईने समक्ष पाहिली तसेच सरकारी पडिक जमिनीवर लागवड करण्यात आलेली शेत जमिन स. नं. ३१६ लगत ची सुध्दा सागवानी लाकूड बाबुराव जोदा तडवी, संजय बाबुराव तडवी, अशोक बाबुराव तडवी, राहुल बाबुराव तडवी, दिलीप बाबुराव तडवी, यांनी तोडून नेली तसेच वनचराई सरकारी पडिक जमिनीवर दोन घरांची जागा खोदुन दादागिरी करत लेव्हल केली आहे. शासकीय जमिनीवर खाजगी विनियोग करणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. याबाबत सुभाष आरशी तडवी यांनी एक महिन्यांपूर्वी ही तक्रार दाखल केली होती. परंतू महिनाभरानंतरही कार्यवाही झालेली नसल्याने प्रशासनाने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.