उमरीपाडात दारू अड्ड्यांवर धाड, दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 12:36 IST2019-03-10T12:35:58+5:302019-03-10T12:36:03+5:30

नंदुरबार : उमरीपाडा, ता. नवापूर येथे दारू अड्डयांवर धाड टाकून विसरवाडी पोलिसांनी एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट ...

In Umeripada, the number of raid on alcohol, one and a half lakhs destroyed | उमरीपाडात दारू अड्ड्यांवर धाड, दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट

उमरीपाडात दारू अड्ड्यांवर धाड, दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट

नंदुरबार : उमरीपाडा, ता. नवापूर येथे दारू अड्डयांवर धाड टाकून विसरवाडी पोलिसांनी एक लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. याबाबत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विसरवाडी पोलिसांच्या पथकाने सकाळी पाच वाजता उमरीपाडा, ता.नवापूर येथे दारू अड्डयांवर धाड टाकली. भिमसिंग पाडवी यांच्याकडे अलसेला १७ हजार ८०० रुपयांचा, सतिष पाडवी यांच्याकडे १८ हजार २०० रुपयांचा, विलास पाडवी यांच्याकडे २० हजार २५० रुपयांचा, उमेश वसावे यांच्याकडे १६ हजार २००, गिमेंद्र वळवी यांच्याकडे २० हजार ८००, सिताराम वसावे यांच्याकडे १५ हजार २००, अनिल वसावे यांच्याकडे २० हजार ५००, सविता वसावे यांच्याकडे १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल त्यात रसायन, महुफुले, गावठी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली.
ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक धनंजय पाटील, फौजदार चंद्रकांत शिंदे, जमादार विजय तावडे, दिलीप गावीत, हवालदार दयाराम वळवी, भिमसिंग ठाकरे, राजेश येलवे, तुषार सोनवणे, विजय वळवी, भगवान गुट्टे, देवेंद्र हिरे, स्मिता पाटील, तुषार पाडवी, किशोर गावीत, सुहास गावीत, दिपक गावीत, विकास वसावे, देवदिास वसावे यांनी केली.

Web Title: In Umeripada, the number of raid on alcohol, one and a half lakhs destroyed