उमर्दे येथे महिलांनी केली दारू नष्ट

By Admin | Updated: June 17, 2017 18:05 IST2017-06-17T18:05:58+5:302017-06-17T18:05:58+5:30

पुरावे पोलीसांसमोर देऊनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े

Udaydea destroyed women by doing alcohol | उमर्दे येथे महिलांनी केली दारू नष्ट

उमर्दे येथे महिलांनी केली दारू नष्ट

ऑनलाईन लोकमत

नंदुरबार, दि. 17 - गावात दारूबंदी करण्याचा चंग बांधलेल्या नंदुरबार तालुक्यातील उमर्दे खुर्द येथील महिलांनी शुक्रवारी गावातील गावठी दारू नष्ट केली़  दारू नष्ट केल्यानंतर तसे पुरावे पोलीसांसमोर देऊनही कारवाई न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
गुरूवारी दारू विक्री करणा:यांना समज देण्यासाठी गेलेल्या महिलांवर मद्यविक्रेते चालून गेले होत़े यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी तहसीलदार नितीन पाटील यांची भेट घेतली होती़ या भेटीवेळी महिलांना गावात दारू विक्रीचे विविध पुरावे दिले होत़े यानंतर तालुका पोलीस ठाण्याकडून कारवाईची अपेक्षा होती़ मात्र पोलीसांकडून कोणताही हस्तक्षेप करण्यात आला नाही़ यामुळे संतप्त महिलांनी मद्यविक्री करणा:यांची दुकाने उद्धवस्त करत गावठी दारूचा साठा गटारीत टाकून दिला़

Web Title: Udaydea destroyed women by doing alcohol