सतोना फाट्याजवळ झालेला अपघातात दोन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:31 IST2021-09-03T04:31:57+5:302021-09-03T04:31:57+5:30
विनेश इंदास पाडवी (२३) रा कुंडल, ता. धडगाव व भिका गीना पाडवी (२२) रा. खुंटामोडी, ता. धडगाव असे ...

सतोना फाट्याजवळ झालेला अपघातात दोन युवक ठार
विनेश इंदास पाडवी (२३) रा कुंडल, ता. धडगाव व भिका गीना पाडवी (२२) रा. खुंटामोडी, ता. धडगाव असे मयतांचे नाव आहे. मयत दोघे युवक बुधवारी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास अक्कलकुवाहून तळोद्याकडे येण्यासाठी निघाले होते. त्यांची मोटारसायकल (क्रमांक एमएच १८ एक्स ५१७५) सतोना फाट्याजवळील फरशी पुलावर आली असता त्यांना आयशर गाडीने (क्रमांक एमएच ०४ आरडीएस २१७२) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही युवक हें गंभीर जखमी झाले. रात्री घटनास्थळी पोलीस हवालदार गोवर्धन वसावे, पो.ना.वनसिंग पाडवी व पेट्रोलिंग करणारे वाहन तत्काळ दाखल झाले. उपविभागीय अधिकारी संभाजी सावंत व पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी घटनास्थळी भेट दिली. येऊन पाहणी केली, दरम्यान सकाळी उशिरा दोघांचे ओळख पटल्यावर दाखल झाले.
तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल व पोलीस नाईक हर्षल साळुंखे करीत आहेत.