खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 12:18 IST2019-09-02T12:18:30+5:302019-09-02T12:18:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीचालकाचा खड्डयात पडून मृत्यू झाल्याची घटना होळ ते कोपर्ली रस्त्यावर ...

Two-wheeler was killed in an attempt to break the pits | खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात दुचाकीस्वार ठार

खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रस्त्यावरील खड्डे चुकविण्याचा नादात दुचाकीचालकाचा खड्डयात पडून मृत्यू झाल्याची घटना होळ ते कोपर्ली रस्त्यावर घडली. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. 
महारू मोतिराम पाटील (60) रा.होळतर्फे रनाळे, ता.नंदुरबार असे मयताचे तर मोतिसिंग एकनाथ भिल असे जखमीचे नाव आहे. महारू पाटील व मोतिसिंग भिल हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच 39-एएफ 2755) भरधाव जात होते. होळ ते कोपर्ली रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रय}ात ते रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डबक्यात पडले. 
महारू पाटील यांच्या अंगावर दुचाकी व ते खाली पाण्याच्या डबक्यात पडल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.   तर दुचाकी चालक मोतिसिंग   एकनाथ भिल यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना खाजगी  रुग्णालयात दाखल करण्यात     आले.
याबाबत रवींद्र दगा पाटील यांनी फिर्याद दिल्याने मोतिसिंग एकनाथ भिल यांच्याविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार प्रकाश अहिरे करीत आहे.
दरम्यान, पावसामुळे  ग्रामिण भागातील रस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे  रस्त्यांची डागडुजी करावी अशी  मागणी ग्रामिण भागातून केली जात आहे. 
 

Web Title: Two-wheeler was killed in an attempt to break the pits