मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:05 IST2019-03-27T21:04:50+5:302019-03-27T21:05:07+5:30
नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला़ ही घटना २३ मार्च ...

मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर दुचाकीस्वार ठार
नंदुरबार : अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर समोरुन येणाऱ्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला़ ही घटना २३ मार्च रोजी सायंकाळी घडली होती़
बेडाकुंड ता़ अक्कलकुवा येथील विजय खाल्या तडवी (३५) हे २३ मार्च रोजी दुचाकीने मोलगीकडे जात असताना साकलीउमर गावाजवळ समोरुन येणाऱ्या एमएच ३९ सी ५२८५ या टेम्पोने धडक दिली़ यात विजय तडवी हे गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले़ याबाबत सोमवारी दाजला ईरमा तडवी यांनी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन टेम्पोचालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक पंडीतराव सोनवणे करत आहेत़
गेल्या आठवड्यात होळी सणामुळे या मार्गावर रहदारी वाढली होती़ यात वाहनांचा वेग चिंतेचा विषय होता़ यातच शनिवारी अपघात झाल्यानंतर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत चारचाकी वाहनचालकांना समज देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती़