भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:29 IST2020-02-05T21:29:25+5:302020-02-05T21:29:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वाराचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. ...

Two-wheeler killed in heavy vehicle collision | भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : भरधाव वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेला दुचाकीस्वाराचा जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना मृत्यू झाला. सारंगखेडानजीक पेट्रोलपंपाजवळ हा अपघात झाला.
रवींद्र देवराम कोळी, (४०) रा.सावळदे, ता.शिरपूर असे मयताचे नाव आहे. शहादा-सारंगखेडा रस्त्याने रवींद्र कोळी हे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ०४ ईयु ३६४१) जात होते. पेट्रोलपंपाजवळ त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन तेथून पसार झाले.
याबाबत पोलीस हवालदार विजय गावीत यांनी फिर्याद दिल्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार जगताप करीत आहे.
दरम्यान, या रस्त्यावर जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेषत: वाळूने भरलेले डंपर मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून जातात. त्यांच्यावर प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे.

Web Title: Two-wheeler killed in heavy vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.