रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 12:16 IST2019-04-12T12:15:58+5:302019-04-12T12:16:23+5:30

अपघात : लोणखेडा येथील घटना

Two-wheeler death due to beating a vertical tractor on the road | रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरला धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार : शहादा तालुक्यातील लोणखेडा येथे रस्त्यावर उभ्या ट्रॅक्टरवर धडकल्याने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाला़ बुधवारी रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली़ 
किशोर सरदार निकुंभे (28) रा़ शिवकॉलनी, लोणखेडा ता़ शहादा हा युवक एमएच 39 एए 8440 या दुचाकीने रात्री लोणखेडय़ातील एकता नगरात जात होता़ दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयासमोर अंधारात ट्रॅक्टर  उभे असल्याचा अंदाज न आल्याने भरधाव वेगातील मोटारसायकल त्यावर जाऊन धडकली़ यात किशोर निकुंभे हा गंभीर जखमी झाला़ खांदे आणि तोंडास गंभीर दुखापत झाली़ त्याला शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला़ याबाबत  पोलीस नाईक जितेंद्र उत्तम ईशी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मयत दुचाकीस्वार किशोर निकुंभे याच्याविरोधात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पाडवी करत आहेत़ 
 

Web Title: Two-wheeler death due to beating a vertical tractor on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.