दोन गावे संविधान साक्षर ग्राम होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:05 IST2019-11-25T11:05:34+5:302019-11-25T11:05:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संविधान दिनाचे औचित्य साधून समतादूत प्रकल्पांतर्गत 26 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील दोन गावांमध्ये एक महिना ...

दोन गावे संविधान साक्षर ग्राम होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : संविधान दिनाचे औचित्य साधून समतादूत प्रकल्पांतर्गत 26 नोव्हेंबर पासून जिल्ह्यातील दोन गावांमध्ये एक महिना संविधान विषयक जनजागृती करुन त्या गावातील प्रत्येक व्यक्तीला संविधान विषयी माहिती देण्यासाठी संविधान साक्षर ग्राम कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
कार्यक्रमांतर्गत गावाची निवड, गाव पाहणी, गावाचा सुक्ष्म आराखडा तयार करणे, गावचा नकाशा तयार करणे आदी प्राथमिक तयारी करून सरपंच, पोलीसपाटील, आशावर्कर, अंगणवाडीवर्कर, गावातील शाळेतील मुख्याध्यापक यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना भारतीय राज्यघटनेचे महत्व, अंमलबजावणी, कायदे याविषयी थोडक्यात प्राथमिक माहिती देण्यात येणार आहे. शंभर टक्के संविधान साक्षरतेची गरज, प्रचार, प्रसार या विषयावर चर्चात्मक आराखडा तयार करून गाव बैठका घेण्यात येणार आहे. युवक-युवती, बचत गटातील महिला, शेतकरी गट, गावातील विविध तरुण मंडळ यांच्या विशेष बैठका, गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्याथ्र्यांसोबत विविध उपक्रम आदींच्या माध्यमातून संविधानाचे महत्व नागरिकांपयर्ंत पोहोचविण्यात येणार आहे. हस्तकला, चित्रकला, विविध स्पर्धा, गांडूळखत प्रकल्प, परसबाग, स्वच्छतेचे महत्व आणि रोज प्रास्ताविकेचे वाचनाची सवय लावणे आदी उपक्रमांचादेखील यात समावेश आहे.
महिलांसोबत विशेष कार्यशाळा आयोजित करुन व्यसनमुक्ती, बचतीची सवय, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्व, लेक वाचवा, वाढवा, शिकवा या विषयावर प्रबोधन कार्यशाळा, स्त्रीयांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढविणे, आरोग्य कॅम्प आयोजित करणे, गावस्वच्छता अभियान राबविणे, महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे, महाविद्यालयीन युवक-युवती यांच्या कार्यशाळा या उपक्रमांचादेखील कार्यक्रमात समावेश करण्यात येणार आहे.
गावातील ग्रामपंचायत कमिटीसाठी पंचायत राज प्रशिक्षण राबविणे, गावातील सर्व जातीधमार्तील सर्व वयोगटातील लोकांना या उपक्रमात सहभागी करुन घेतले जाईल.
विविध मान्यवर विचारवंत, भारतीय संविधानाचे अभ्यासक, लेखक यांना गावभेटीसाठी पाचारण करणे आदी माध्यमातून हा कार्यक्रम राबवावा, असे मुख्य प्रकल्प संचालिका समतादूत प्रकल्प, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी सांगितले.
भारतीय संविधान आणि मुलभूत अधिकार या विषयावर त्या त्या विभागातील शासकीय अधिकारी वक्ते म्हणून राहतील.
तसेच गावातील प्रत्येक घरात राज्यघटना देणे, प्रत्येक घरात भारतीय राज्यघटनेचे प्रास्ताविक भिंतीवर लावणे, शाळेमध्ये भारतीय संविधानाचे प्रास्ताविक लावणे रोज नियमित वाचन घेणे, भारतीय संविधान उद्देशिकेची कोनशिला तयार करण्यात येईल.
गावाच्या सुरुवातीलाच ठळक भागात ती लावली जाईल.