Two thousand hectares of crop water | दोन हजार हेक्टर पीक पाण्यात

दोन हजार हेक्टर पीक पाण्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील साडेचार हजार शेतक:यांच्या साधारण दोन हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसानीचे पंचनामे येथील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या शेतक:यांना नुकसान भरपाईची प्रतिक्षा असून, शासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आहे.
गेल्या 15 दिवसांपूर्वी संपूर्ण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वच पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावला होता. त्यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. येथील कृषी विभाग व महसूल कर्मचा:यांच्या संयुक्त मोहिमेने युद्धपातळीवर शेतक:यांच्या शेतात जावून नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील चार हजार 453 शेतक:यांचे साधारण एक हजार 970 हेक्टर क्षेत्रावरील कापूस, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वात जास्त कापूस पिकाला फटका बसला आहे. साधारण एक हजा 604 हेक्टर क्षेत्रातील या पिकाचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. त्याखालोखाल ज्वारीचे झाले आहे. 115 हेक्टर ज्वारीचे नुकसान झाले आहे. सोयाबीनचेही जवळपास 100 हेक्टरचे नुकसान झाले आहे. याशिवाय केळी व पपई या नगदी पिकांचेही साधारण 25 हेक्टरचे नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. आता पुढील कार्यवाही तातडीने प्रशासनाने करून शेतक:यांना भरपी देण्याची अपेक्षा आहे. शेतक:याचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेला आहे. कारण 90 टक्यांपेक्षा अधिक प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शेतक:यांचा झालेला खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे आता शेतकरी रब्बीकडे वळला आहे. परंतु त्यांच्याकडे रब्बीला लागणारा खर्चदेखील हातात नाही. त्यामुळे रब्बीचा पीक पेरा, रासायनिक खतांचा खर्च कुठून आणावा. आधीच त्याने खाजगी सावकाराबरोबरच उधार-उसनवारीने पैसे घेतले आहे. ते पैसे कसे फेडावे अशा विवंचनेत असल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली आहे. शासनाने शेतक:यांचा रब्बी हंगाम लक्षात घेऊन नुकसान भरपाई दिली तर खरीपाचा नुकसानीचा बसलेला फटका विसरून रब्बीकडे निदान त्यांच्या आशा पल्लवीत राहतील. परंतु यासाठी प्रशासन व राजकारण्यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवण्याची अपेक्षा आहे.

तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, तळवे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी अवकाळी झालेल्या पावसामुळे कापूस पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधीत यंत्रणेने अद्यापही त्याच्या नुकसानीचे पंचनामे केले नाहीत. याबाबत संबंधत शेतक:यांनी तक्रारीही केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांना कापसाचे पंचनामे न करण्याचेही महसूल कर्मचा:यांनी सांगितल्याचे हे शेतकरी सांगतात. त्यामुळे कृषी व महसूल विभागाने याप्रकरणी दखल घेऊन अशा शेतक:यांच्या कापसाचे पंचनामे करण्याचे आदेश आपल्या कर्मचा:यांना द्यावेत, अशी मागणी शेतक:यांनी केली आहे.
 

Web Title: Two thousand hectares of crop water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.