शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बारडोलीनजीक दोन एस.टी.बसेसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 12:43 IST

पाचजण जखमी : बसला ट्रकची धडक, प्रवासी घेण्यासाठी आलेल्या बसलाही टेम्पोची धडक

उभ्या असलेल्या बसवर ट्राला धडकुन झालेल्या अपघातातील प्रवाशांना घेण्यासाठी गेलेल्या नवापूर आगाराच्या बसला लग्नाचे व:हाड घेऊन जाणा:या टेम्पोने धडक दिल्याची घटना रात्री साडेतीन वाजता बारडोली जवळ घडली. अपघातात टेम्पो मधील तिघे गंभीर जखमी असुन नवापूर आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे यांच्यासह इतर पाचजण किरकोळ जखमी झाले.       मिळालेल्या माहितीनुसार,  5 मे रोजी धुळे आगाराची अहमदाबाद-धुळे ही बस धुळ्याकडे येत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर बारडोली पासून आठ किमी अंतरावरील हिंडोलीया गावाजवळ मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास पंर झाली. बस मध्ये पाच ज्येष्ठ प्रवासी मिळुन एकुण 58 प्रवासी होते. चार महिन्याचे बाळ असलेली एक महिला बसमध्ये बसली होती तर अन्य प्रवासी बसच्या खाली उतरुन रस्त्याच्या कडेला उभे होते. बस चालक एम. बी. पवार व वाहक पी. आर. सोनार मागील पंर चाक बदलत असतांना 18 टायरचा ट्रक ट्रॉला बसच्या मागे जोरात धडकला. या अपघातात बसमधे बसुन असलेली महिला किरकोळ जखमी झाली तर ट्रक  चालकाच्या हातास दुखापत झाली. राज्य परिवहनच्या बसचे अंदाजे सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले. बारडोली पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुन्हा दुसरा अपघात..मध्य रात्रीच्या सुमारास नवापूर मार्गे धुळेकडे जाणा:या राज्य परिवहनच्या अन्य बसेस मध्ये प्रवासी जास्त असल्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना नेण्यासाठी नवापूर आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांना कळविण्यात आले. वाहतूक निरीक्षक नाना भामरे, वाहतूक लिपीक भाविन पाटील, तीन तांत्रिक कर्मचारी, चालक जे. पी. मेश्राम व वाहक एस. एच. आडे यांना सोबत घेऊन अहमदाबाद धुळे वाहनाचा अपघात हाताळण्यासाठी नवापूर येथुन तीन वाजेच्या सुमारास नवापूर आगाराची बस रवाना झाले. मध्यरात्री अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रस्त्याच्या दुस:या बाजूस बस उभी करुन वाहतूक निरीक्षक नाना भामरे यांनी अपघातग्रस्त बसची खातरजमा करून नवीन आणलेली बस तेथे नेली. बस वळविण्यासाठी पुढे काढताच जळगाव येथे लग्न समारंभ आटोपून बारडोलीकडे परतीचा प्रवास करीत असलेला आयशर टेम्पो  मागच्या बाजुने बसवर जोरात धडकला. त्यात आगार व्यवस्थापक राजेंद्र अहिरे बसमधे फेकले गेल्याने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मुका मार बसला. तर तांत्रिक कर्मचारी  जी. बी. बहिरम यांच्या कमरेला मुका मार बसला. टेम्पो चालकासह कॅबीनमधील तीन प्रवासी यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना बारडोली व पुढे सुरत येथे हलविण्यात आले. टेम्पोच्या केबीनचा चक्काचूर होऊन मागे ठेवलेल्या लग्न सामानाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड झाली. टेम्पो मधील व:हाडी मात्र सुखरुप बचावलेत. नवापूर आगाराच्या बसचे अंदाजे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले.