दोन घरफोडय़ांमध्ये कारसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 13:01 IST2018-10-13T13:01:29+5:302018-10-13T13:01:34+5:30
हुडको कॉलनी : चावी हाती लागताच कारही नेली चोरून

दोन घरफोडय़ांमध्ये कारसह दागिने लंपास
नंदुरबार : शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून 11 ऑक्टोबर रोजी रात्री चोरटय़ांनी पुन्हा घरफोडी करून एक लाखाची कारसह दुस:या घरातून तीन हजारांचे दागीने लंपास केल्याची घटना हुडको कॉलनी व मदनमोहन नगरात घडली. उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, हुडको कॉलनीत राहणारे हर्षल सुनील वसावे हे बाहेरगावी गेले होते. त्यांच्या बंद घराची संधी साधून चोरटय़ांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरात त्यांना किंमती ऐवज न मिळाल्याने त्यांनी कपाटातील ड्राव्हरमध्ये ठेवलेली कारची चाबी घेवून अंगणात उभी असलेली कार चोरून नेली. आरसी बूकसह एकलाख रुपयांची कार चोरून नेल्याची फिर्याद हर्षल वसावे यांनी उपनगर पोलिसात दिली.
तेथून चोरटे लगतच्या मदनमोहन नगरात गेले. सुरेश वानखेडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील सोन्याचे दागीने लंपास केले. 20 हजार रुपयांची सोन्याची चेन व दहा हजार रुपये किंमतीची अंगठी चोरटय़ांनी चोरून नेली. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
चोरटय़ांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरवासीांकडून होत आहे.