वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला दोघांनी केली धक्काबुकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 12:36 IST2020-07-31T12:36:15+5:302020-07-31T12:36:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुचाकीवर डबलशीट जाणाऱ्यांना अडविले असता दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुकी करून धमकी दिल्याची घटना २९ ...

वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला दोघांनी केली धक्काबुकी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुचाकीवर डबलशीट जाणाऱ्यांना अडविले असता दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुकी करून धमकी दिल्याची घटना २९ रोजी सकाळी घडली. याप्रकरणी पोलीस कर्मचाºयाच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे.
मच्छिंद्र माधव माळी, रा.स्वप्नील विहार, होळ शिवार व संदीप दिनेश सोनवणे, रा.सुरत असे अटक करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, लॉकडाऊनमुळे शहरात विनाकारण फिरणाºयांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.
जगतापवाडीजवळ नंदुरबारात येणाºया रस्त्यावर देखील बॅरीकेट्स लावून नाकाबंदी करण्यात आली आहे. या ठिकाणी २९ रोजी सकाळी नऊ वाजता वाहतूक पोलीस कर्मचारी अविनाश कोकणी हे नेमणुकीला होते. त्यावेळी मच्छिंद्र माळी व संदीप सोनवणे हे त्या ठिकाणी आले.
एकाच दुचाकीवर (क्रमांक एमएच ३९ एएफ ९८५७) दोन्हीजण असल्याने कोकणी यांनी त्यांना अडविले. लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरण्यास मनाई असल्याचे सांगून डबलसीटवर ही बंदी असल्याचे सांगितले. त्यावरून दोघांनी वाद घालून पोलीस कर्मचारी अविनाश कोकणी यांना धक्काबुकी केली. तसेच धमकी दिली.
याबाबत कोकणी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्याने मच्छिंद्र माळी व संदीप सोनवणे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणने, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणे यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. तपास हवालदार प्रदीप सोनवणे करीत आहे.