नंदुरबारात दोन ठिकाणी चोरी 90 हजारांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 12:55 IST2018-11-18T12:55:11+5:302018-11-18T12:55:17+5:30
नंदुरबार : बसस्थानकात वृद्ध प्रवाशाच्या पिशवीतून 60 हजार तर पटेलवाडीत छतावर झोपलेल्याजवळील 39 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना ...

नंदुरबारात दोन ठिकाणी चोरी 90 हजारांचा ऐवज लंपास
नंदुरबार : बसस्थानकात वृद्ध प्रवाशाच्या पिशवीतून 60 हजार तर पटेलवाडीत छतावर झोपलेल्याजवळील 39 हजारांचा मुद्देमाल चोरटय़ांनी चोरून नेल्याची घटना शहरात घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार बसस्थानकात 16 रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सेवानिवृत्त शिक्षक श्यामराव चतूर पाटील, रा.हुडको कॉलनी हे थांबले होते. त्यांच्या जवळील पिशवीत 50 हजार रुपये रोख ठेवलेले होते. त्यांच्याजवळील नॉयलॉन पिशवीच चोरटय़ांनी अलगद चोरून नेली. त्यात रोख 50 हजारासह बँकेचे तीन पासबूक देखील होते. श्यामराव पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली, परंतु उपयोग झाला नाही. त्यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक गुलाब तेले करीत आहे.
दुसरी घटना पटेलवाडीतील बादशहा नगरात घडली. प्लॉट क्रमांक तीन मध्ये राहणारे शोएब जुबेर आसिफ शेख हे त्यांच्या घराच्या गच्चीवर झोपले होते. रात्री चोरटय़ांनी त्याच्या कपडय़ांच्या खिशात असलेली रोख रक्कम व तीन मोबाईल असा एकुण 39 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सकाळी त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शोधाशोध केली. शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक पावरा करीत आहे.