प्रकाशा येथे भिंत कोसळून दोन जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 12:44 IST2019-08-06T12:44:15+5:302019-08-06T12:44:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : येथील पिपरहाटीतील कलाबाई काशीनाथ भील यांच्या झोपडीवर मागील बाजूच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. ...

प्रकाशा येथे भिंत कोसळून दोन जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : येथील पिपरहाटीतील कलाबाई काशीनाथ भील यांच्या झोपडीवर मागील बाजूच्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. प्रकाशा येथील पिपरहाटीत कलाबाई भिल ह्या मुलगा, सून व व नातवंडांसह राहतात. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झोपले असताना घराच्या मागील बाजूची भिंत अचानक त्यांच्या झोपडीवर कोसळली. त्यात सोमेश प्रकाश भिल याच्या डोक्याला मार लागला तर शंकर प्रकाश भील याला मुका मार लागला आहे. भिंत कोसळल्याचा आवाज येताच कलाबाई भिल यांनी नातवंडांना घेऊन बाहेर निघाल्या. दोन्ही जखमी मुलांवर औषधोपचार करण्यात आले. प्रकाशाचे तलाठी डी.एम. चौधरी यांनी नुकसानीचा पंचनामा केला. या वेळी सरपंच सुदाम ठाकरे उपस्थित होते. भिंत कोसळल्याने कलाबाई भिल यांचा संसार उद्ध्वस्त झाला असून त्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.