वळण रस्त्यावर चार वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोनजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:57 IST2019-09-16T11:57:47+5:302019-09-16T11:57:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात ...

वळण रस्त्यावर चार वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोनजण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : वळण रस्त्यावरील नवापूर चौफुली ते कोकणीहिलर्पयतचा रस्ता अपघात प्रवण क्षेत्र झाला आहे. दोन दिवसात दोन अपघात होऊन चारजण जखमी झाले आहेत. दरम्यान, शनिवारी एकाचवेळी चार वाहनांचा विचित्र अपघात झाला.
वळण रस्त्यावर वाहने भरधाव जात असतात. चार महिन्यांपूर्वी कल्याणेश्वर गणपती मंदीराजवळ अपघात होऊन युवतीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या ठिकाणी गतिरोधक बसविण्यात आले. आता कोकणीहिल ते नवापूर चौफुली हा रस्ता अपघाती म्हणून ओळखला जात आहे. शनिवारी सायंकाळी या ठिकाणी विचित्र अपघात झाला. एक कार, एक पीकअप वाहन आणि दोन दुचाकींमध्ये हा अपघात झाला.
सोनगीरपाडा आरोग्य उपकेंद्रातील डॉ.सचिन चैत्राम नेरकर हे आपल्या दुचाकीने वाघेश्वरी चौफुलीकडे जात असतांना पी.के.अण्णा पाटील विद्यालयासमोरील रस्त्यावर अचानक त्यांच्या दुचाकीपुढे कुत्रा आल्याने त्यांनी अचानक ब्रेक दाबला. त्यांच्या मागे येणा:या कारने त्यांना वाचविण्याचा प्रय}ात दुचाकीला धडक दिली. त्यांच्या मागे असलेल्या पीकअप वाहनाने कारला धडक दिली. त्याचवेळी समोरून येणा:या आणखी एका दुचाकीला पीकअपची धडक बसली.
या विचित्र अपघातात दोनजण जखमी झाले. त्यातील महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
याबाबत सचिन नेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पीकअप वाहनचालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे.
दोन दिवसांपूर्वीच नवापूर चौफुलीजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वार दोनजण जखमी झाले होते. कुंदन भरत भिल व सचिन दिपक भिल, रा. लहान माळीवाडा, नंदुरबार असे जखमींची नावे आहेत. भरधाव येणा:या कारने (क्रमांक एमएच 39-एन 3381) दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोन्ही युवक जखमी झाले. अपघातानंतर कार न थांबता तेथून पसार झाली.
याबाबत कुंदन भिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक जाधव करीत आहे.
अपघात झालेल्या ठिकाणी शाळा आहे. थोडय़ाच अंतरावर दंडपाणेश्वर मंदीर आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वर्दळ असते. पी.के.अण्णा पाटील शाळेने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देवून या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. परंतु दोन्ही विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दोन्ही विभाग आणखी किती अपघातांची वाट पहाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.