नाल्याच्या पुरात बुडून दोन बैलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:08 IST2019-09-20T12:08:27+5:302019-09-20T12:08:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गुरूवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपर्डे, ...

नाल्याच्या पुरात बुडून दोन बैलांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : गुरूवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नाल्याला आलेल्या पुरात दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना पिंपर्डे, ता.शहादा येथे घडली. सुदैवाने शेतकरी बैलगाडी सोडून शेतात कामाला गेल्याने बचावला.
गुरूवारी दुपारी शहादा तालुक्यात अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील पिंपर्डे गावाजवळील नाल्याला अचानक पूर आल्याने बैल जोडी सह गाडी वाहून गेल्याने दोघे बैल जागेवरच मरण पावले आहेत. शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करीत असताना अचानक दुपारी नाल्याला पूर आला असे त्यांना समजताच त्यांनी शेतातून नाल्याकडे धाव घेतली व बैलगाडी बाहेर काढण्याचा प्रय} केला मात्र पाण्याचा वेग एवढा मोठा होता की त्यांना ते शक्य झाले नाही.
अखेर ज्या सर्जा राजा मुळे कष्ट करून आपली उपजीविका भागवली जात होती ते दोन्ही बैल पुराच्या पाण्यात बुडाले. या अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपल्यासमोर दोन्ही बैलांचा तडफडत मृत्यू बघण्याची वेळ शेतकरी मराठे यांच्यावर आली.
बैल बुडत असल्याचे बघून त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आक्रोश ऐकुण आजूबाजूच्या शेतक:यांनी व गावक:यांनी नाल्याकडे धाव घेतली व बैलजोडी वाचविण्याचे प्रय} केले मात्र त्यात यश आले नाही. बुधवारी देखील सायंकाळी सुमारे तासभर पावसाने तुफान बॅटिंग केल्याने शहर व तालुका जलमय झाला होता.
दरम्यान, पंचानामा करून शेतक:याला नैसर्गिक आपत्तीखाली मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या नाल्याच्या पुरामुळे शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.